Home > News Update > घबराइए मत, आएगा तो मोदी ही!!: अनुपम खेर सोशल मीडियावर ट्रोल

घबराइए मत, आएगा तो मोदी ही!!: अनुपम खेर सोशल मीडियावर ट्रोल

घबराइए मत, आएगा तो मोदी ही!!: अनुपम खेर सोशल मीडियावर ट्रोल
X

देशात कोरोनाने हजारो लोक औरत असताना लोक सोशल मीडियावर मोदींच्या रणनीतिवर प्रश्न उपस्थित करत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी घाबरू नका येणार तर मोदीच असं म्हणत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता याना डिवचले आहे. त्यानंतर नेटिझन्सनी खेर यांची यथेच्छ धुलाई केली आहे. शेखर गुप्ता आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात… 'साठच्या दशकात मी लहान होतो. त्यामुळे देशावरील प्रत्येक संकट पाहिले. तीन मोठ्या लढाया, अन्नाचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती यांचा या संकटामध्ये समावेश होता. फाळणीनंतरची आपत्तीही पाहिली. पण सरकारी यंत्रणा हरविल्याचे भारताने आतासारखे कधीही पाहीले नाही. सध्या नियंत्रण कक्षाचा अभाव, उत्तरदायित्व स्विकारण्यास कुणीही नाही, संपूर्ण सरकारी व्यवस्थेची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे.'



 असं ट्वीट ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी करताच त्याला अनुपम खेर यांनी उत्तर दिलं आहे.

 शेखर गुप्ताजी, तुमच्या दर्जापेक्षा हे जरा अतीच झालं. संपूर्ण जगासाठी 'कोरोना' एक संकट आहे. यापूर्वी अशा संकटाचा सामना आपण कधी केला नाही. सरकारची समिक्षा जरूर केली पाहीजे. टीकाही केली पाहीजे. पण या समस्येशी झुंज देणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तसेही तुम्ही घाबरू नका, येणार तर मोदीच. दरम्यान येणार तर मोदीच असं म्हणतात लोकांनी अनुपम खेर यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. सध्या अनुपम खेर ट्वीटरवर ट्रेडींगला असून त्यांना ट्रोल केलं जात आहे. Last Human या ट्वीटर अकाउंटवरुन एक ट्वीट करण्यात आलं असून या अकाउंटवरून अनुपम खेर यांचा फोटो ट्वीट केला आहे. खेर यांच्या डोक्याचं टक्कल आणि मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास या दोघांची तुलना करत कोटी केली आहे.
 


Killer Bean या अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओमध्ये मोदींचा महिमा गाणाऱ्या एका मुलाची भक्तीगिरी सांगितली आहे.

Updated : 26 April 2021 4:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top