Home > News Update > Indian Student : रशिया-युक्रेन युध्दात आणखी एका विद्यार्थ्याला लागली गोळी

Indian Student : रशिया-युक्रेन युध्दात आणखी एका विद्यार्थ्याला लागली गोळी

रशिया युक्रेन युध्दात आणखी एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेच्या डिजिटल आवृत्तीने दिले आहे.

Indian Student : रशिया-युक्रेन युध्दात आणखी एका विद्यार्थ्याला लागली गोळी
X

रशिया युक्रेन युध्द सलग नवव्या दिवशीही सुरुच आहे. त्यातच हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर कर्नाटक येथील शेखरप्पा या विद्यार्थ्याचा रशियाने खारकीव्हवर केलेल्या मिसाईल हल्ल्यात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आता आणखी एका विद्यार्थ्याला गोळी लागली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दात एका भारतीयाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यापाठोपाठ आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याचे धक्कादायक वृत्त आले आहे.

रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत आहे. तर रशिया युक्रेनच्या कीव्ह, खारकीव्ह, सुमी या शहरांवर हल्ले चढवत आहे. मात्र अजूनही हजारो भारतीय नागरीक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यातच भारत सरकारने सूचनापत्र जारी करत लवकरात लवकर खारकीव्ह आणि कीव्ह सोडण्याच्या सूचना भारतीय विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर अजूनही काही विद्यार्थी खारकीव्ह आणि कीव्ह शहरात अडकून पडले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपुर्वी कर्नाटक राज्यातील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचा खारकीव्हमध्ये रशियाच्या मिसाईल हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र त्यापाठोपाठ युक्रेनची राजधानी कीव्ह शहरात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याचे वृत्त आहे. तर या विद्यार्थ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेच्या डिजिटल आवृत्तीने दिले आहे.

यु्क्रेनमधील युध्दग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारतर्फे ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. यामार्फेत आतापर्यंत 6 हजार 400 नागरीकांना मायदेशी परत आणण्यात येत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.


Updated : 4 March 2022 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top