Home > News Update > सलमान गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक...!

सलमान गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक...!

सलमान गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक...!
X

बॉलीवूड चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट या राहत्या घरी सलमान खानवर गोळ्या दोन युवकांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांनतर ते दोघेही आरोपी गुजरात पोलीसांनी पकडून अटक केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या अधिक तपासाअंती आणखी दोन आरोपी अटक करण्यात आले होते. आता मुंबई गुन्हे शाखेला या प्रकरणात आणखी एका आरोपीला पकडण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखा पथकाने या संशयित आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीला राजस्थान येथून अटक करण्यात आली असून त्याचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. मोहम्मद चौधरी याच्यावर असा आरोप आहे की, त्याने या प्रकरणात विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन शुटर्सना मदत केली होती.

याच गोळीबार प्रकरणात आरोपी अनुप थापन याने आत्महत्या केली होती. त्याचा मृत्यू आत्महत्या नसल्याचे सांगत त्याच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलीस कोठडीतच त्याचा प्राण गेला आहे. त्याचा हा मृत्यू संशयास्पद असून त्याचा योग्य पध्दतीने तपास व्हायला पाहिजे. त्याने आत्महत्या केली असेल यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वास बसत नाही. या प्रकरणात लॉरेन्स विश्नोई आणि त्याच्या गँगचे नाव समोर आले आहे. तर लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे.

Updated : 7 May 2024 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top