Home > News Update > टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या 70 वर

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या 70 वर

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या 70 वर
X

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. आज पुन्हा 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल (रविवारी) देखील 30 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता नवोदय विद्यालयातील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या 70 वर पोहचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांवर सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांचे नमुने ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कालच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, खासदार सुजय विखे यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी अनेक पालकांनी निगेटिव्ह विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची विनंती केली होती.मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले होते की, निगेटिव्ह विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच विलीगिकरणात ठेवावे लागेल.आज 20 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Updated : 27 Dec 2021 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top