Home > News Update > 'द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करा' ; माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी

'द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करा' ; माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करा ; माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी
X

सांगली : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच यंदाही अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, त्यांना आर्थिक मदत मिळायला हवी. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी मिरज तालुक्यातील लिंग्णूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगली जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार कोटींचे नुकसान

मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील 60 ते 70 हजार एकरावरील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर घडकुज, दावन्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले. द्राक्ष बागासाठी एकरी चार ते पाच लाखांचा खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नुकसानीचा सरासरी आकडा हा चार ते साडेचार हजार कोटींवर गेल्याचा अंदाज व्यक्त होत. राजू शेट्टी यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहाणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली.

Updated : 6 Dec 2021 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top