Home > News Update > रशियामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण

रशियामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण

रशियामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण
X

कामगार, दलित आणि वंचितांचा हुंकार आपल्या साहित्यामधून मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जागतिक पातळीवर मोठा गौरव झाला आहे. रशिय़ामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. रशियातील फॉरेन लँग्वेज स्टडी या संस्थेने अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारला आहे. दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांचा रशियात अनेक महिने मुक्काम होता, त्यांचे बरेचसे साहित्य रशियन भाषेत भाषांतरीत झाले आहे आणि तिथे ते लोकप्रिय देखील झाले आहे.


Updated : 14 Sep 2022 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top