Home > News Update > वाईन विक्रीच्या विरोधातील अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

वाईन विक्रीच्या विरोधातील अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

वाईन विक्रीच्या विरोधातील अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
X

Photo courtesy : social media

राज्य मंत्रीमंडळाने राज्यातील किराणामालाचे दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात 14 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयानंतर आणि सचिवांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.

राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर राज्यभरातून संमीश्र प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत होत्या. तर भाजपाने राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. त्यातच राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र ग्रामसभेच्या निर्णयानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, 27 जानेवारी रोजी राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचा महिला आणि बालकांसह युवकांवरही गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र ग्रामसभेच्या निर्णयानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे घोषित केले.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, 27 जानेवारी रोजी राज्य मंत्रीमंडळाने किराणामालाच्या दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मी 3 फेब्रुवारी रोजी, 5 फेब्रुवारी रोजी दोन वेळा पत्र लिहून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कळविले होते. मात्र माझ्या पत्राची दखल न घेतल्याने मी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांनी भेट घेत लोकांची मतं मागवून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे लेखी सांगितले. तर ग्रामसभेने ठराव घेत अण्णा हजारे यांना उपोषण न करण्याची विनंती केली. त्यामुळे अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

ग्रामसभा ही लोकसभा आणि विधानसभा यांना जन्म देणारी आहे. ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान राखत मी उपोषण मागे घेत आहे. तसेच वाईन ही आपली संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तुम्ही वाईन खुल्याने विक्री करत आहात. त्यामुळे अशा राज्यात मला जगायची इच्छाच उरली नाही, असे भावनिक मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.


Updated : 13 Feb 2022 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top