Home > News Update > अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र, तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र, तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर शहरात 25 वर्षे शिवसेनेचे आमदार राहिलेले शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांचे पूत्र विक्रम राठोड यांना अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे

अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र, तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल
X

अहमदनगर // अहमदनगर शहरात 25 वर्षे शिवसेनेचे आमदार राहिलेले शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांचे पूत्र विक्रम राठोड यांना अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत विक्रम राठोड यांनी अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विक्रम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की अज्ञात व्यक्तीने पोस्टाद्वारे शिवसेनेच्या चितळे रस्त्यावरील कार्यालयात निनावी पत्र पाठविले. या पत्रात धमकी देण्यात आली आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, कारण तुझ्या बापाने नगरचा कधीच विकास केला नाही. तू तरी काय करणार. सोबतच शिवसेना कार्यकर्ते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.तर या पत्रात पुढे म्हटले आहे की, संग्राम भैय्यांच्या निवडणुकीत पडला तर तुझ्या सकट सगळ्यांचा काटा काढू. त्यामुळे नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्यांना पोलिस संरक्षण दिले होते. दरम्यान त्यांना धमकीचे पत्र मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चितळे रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात एकच गर्दी केली होती. याबाबत तोफखाना पोलिसांनी कलम 507 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Updated : 23 Dec 2021 2:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top