Home > News Update > अनिल देशमुख यांच्या पत्रात राजीनामा शब्दच नाही…




अनिल देशमुख यांच्या पत्रात राजीनामा शब्दच नाही…




अनिल देशमुख यांच्या पत्रात राजीनामा शब्दच नाही. त्यामुळं देशमुख यांचा राजीनामा हा चौकशी कालावधी पुरताच आहे का? वाचा...

अनिल देशमुख यांच्या पत्रात राजीनामा शब्दच नाही…



X

आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची चौकशी करताना या पदावर राहने नैतिक दृष्ट्या योग्य नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या पत्रात कुठंही माझा राजीनामा स्विकारावा. असं म्हटलेलं नाही. त्यांच्या पत्रात 'पदापासून दूर राहण्याची इच्छा आहे, कार्यमुक्त करा, अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला आहे. राजीनामा शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. या अगोदर संजय राठोड यांच्या राजीनाम्यामध्ये राजीनामा शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा चौकशी कालावधी पुरताच आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे.



काय म्हटलंय पत्रात…



मा. मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांनी अॅड जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारीत केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी. बी. आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुषंगाने मी मंत्री (गृह) या पदाकर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वतः या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे. ही नम्र विनंती.




Updated : 5 April 2021 9:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top