Home > News Update > अनिल देशमुख यांना क्लीन चीट, माध्यमांच्या वृत्तांमध्ये खरंच तथ्य आहे का?

अनिल देशमुख यांना क्लीन चीट, माध्यमांच्या वृत्तांमध्ये खरंच तथ्य आहे का?

अनिल देशमुख यांना क्लीन चीट, माध्यमांच्या वृत्तांमध्ये खरंच तथ्य आहे का?
X

काही माध्यमांनी अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचे वृत्त दिलं आहे. मुंबई चे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

हिंदी वृत्तवाहिनी आजतक ने

मुंबई: वसूली कांड में CBI की वायरल रिपोर्ट में अनिल देशमुख को क्लीन चिट?

या ठळक मथळ्याखाली आज तक ने व्हायरल झालेल्या कथित सीबीआय डॉक्यमेंटच्या आधारे हे वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्र टाईम्सने देखील सीबीआय ने अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिल्याचं वृत्त आहे. एका पीडीएफ च्या आधारे हे वृत्त देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाईम्स च्या ऑनलाईन आवृत्तीने

अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चीट?; त्या पीडीएफमुळं चर्चांना उधाण

या ठळक मथळ्यात वृत्त दिलं आहे.

Tv9 मराठी ने अनिल देशमुख यांच्या क्लीन चीट संदर्भात दिलेल्या वृत्तात सीबीआयचे उपअधिक्षक आर एस गुंजाळ यांनी चौकशी अहवाल सादर केलाय. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याचं म्हटलं आहे.

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI कडून क्लीनचिट?

दैनिक लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीने अनिल देशमुख यांना 'क्लीनचिट' देण्यात आली असल्याचा दावा करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे

वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट? सीबीआयने केला खुलासा

या ठळक मथळ्याखाली वृत्त दिलं आहे.

अशाच प्रकारे व्हायरल झालेल्या कागदपत्रांनुसार विविध माध्यमांनी अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं सर्व माध्यमांनी व्हायरल झालेल्या कथित सीबीआयच्या पत्रानुसार वृत्त दिलं आहे. त्यामुळं या वृत्तावर जोपर्यंत सीबीआय अधिकृत खुलासा करत नाही. तोपर्यंत हे वृत्त खरं आहे. असं आपण म्हणू शकत नाही.

Updated : 29 Aug 2021 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top