Home > News Update > नुकसानग्रस्त भागात अधिकारी फिरकेना; संतप्त शेतकऱ्यांनी रोड बंद पाडला

नुकसानग्रस्त भागात अधिकारी फिरकेना; संतप्त शेतकऱ्यांनी रोड बंद पाडला

नुकसानग्रस्त भागात अधिकारी फिरकेना; संतप्त शेतकऱ्यांनी रोड बंद पाडला
X

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मात्र असं असताना शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अजूनही बांधावर पोहचली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर पंचनामे करण्यासाठी अधिकारी येत नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्ता बंद करून आंदोलन सुरु केले आहे.

सोयगाव तालुका घोसला येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी न आल्याने सोयगाव- चाळीसगाव रस्ता बंद पाडला आहे. शेतात काहीच उरलं नाही,सगळं पाण्यात वाहून गेलं आहे. मात्र अजूनही तहसीलदार सोडा गावाचे तलाठी सुद्धा येत नसल्याचे आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची वागणूक पाहता मुख्यमंत्र्यांची घोषणा फक्त राजकीय घोषणा ठरू नयेत म्हणजे झालं.

Updated : 2 Oct 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top