Home > News Update > ...आणि त्याने बाबासाहेबांचं गाणं ऐकताना घेतला अखेरचा श्वास

...आणि त्याने बाबासाहेबांचं गाणं ऐकताना घेतला अखेरचा श्वास

...आणि त्याने बाबासाहेबांचं गाणं ऐकताना घेतला अखेरचा श्वास
X

मृत्यूशी झुंज देत असुन सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं ऐकण्याची इच्छा ते व्यक्त करत होते. नातेवाईकांनी बाबासाहेबांचे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकतानाच सांगलीतील चित्रकार, उत्कृष्ट रांगोळीकार, दलित पँथरचे नेते प्रसाद एरंडोलीकर यांनी आपले प्राण सोडले."माझा अंत जवळ आलाय, मला माझ्या बाबासाहेबांची भीम गीते ऐकु द्या......" हे होते सांगलीतील चित्रकार, उत्कृष्ठ रांगोळीकार, दलित पँथरचे नेते प्रसाद सहदेव एरंडोलीकर यांचे अखेरचे शब्द... प्रसाद सहदेव एरंडोलीकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. डॉक्टर यांनी घरी घेऊन जावा असा सल्ला दिला होता. घरातील मंडळी त्यांची काळजी घेत होते. मात्र एरंडोलीकर सातत्याने बाबासाहेबांची गाणी ऐकण्याची इच्छा व्यक्त करत होते. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्ष 59 होते. १२ ऑक्टोबर ला अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे.

Updated : 13 Oct 2021 4:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top