Home > News Update > तिरंगा लावताना छतावरून पडून वृध्दाचा मृत्यू

तिरंगा लावताना छतावरून पडून वृध्दाचा मृत्यू

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान तिरंगा लावताना पालघर जिल्ह्यात छतावरून पडून एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तिरंगा लावताना छतावरून पडून वृध्दाचा मृत्यू
X

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यातच या मोहिमेत सहभागी होत घरावर चढून तिरंगा लावताना वृध्दाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यासाठी घर घर तिरंगा मोहिम सुरू केली आहे. तर देशभरातून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार या मोहिमेत सहभागी होण्यासाठी छतावर चढून तिरंगा लावताना लक्ष्मण भाऊ शिंदे या 70 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना शिंदे परिवारावर शोककळा पसरली आहे.

जव्हार तालुक्यातील नांदगाव( राजे वाडी) येथील लक्ष्मण भाऊ शिंदे (वय 70) वर्ष हे वयोवृद्ध सकाळी 7 :00-वाजता राष्ट्रध्वज तिरंगा घरावर लावण्यासाठी घरावर चढले होते. परंतु तिरंगा लावताना ते पाय घसरून छतावरून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला व छातीला मोठी दुखापत झाली. यानंतर त्यांना तात्काळ वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु तिथे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. यानंतर त्यांना जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची तब्बेत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान शनिवारी दुपारी लक्ष्मण शिंदे या वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Updated : 13 Aug 2022 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top