Home > मॅक्स रिपोर्ट > सांस्कृतिक दहशतवाद, राजकीय भूमिका घेतल्यामुळे कलाकाराला सिरीयलमधून काढल्याचा आरोप

सांस्कृतिक दहशतवाद, राजकीय भूमिका घेतल्यामुळे कलाकाराला सिरीयलमधून काढल्याचा आरोप

सांस्कृतिक दहशतवाद, राजकीय भूमिका घेतल्यामुळे कलाकाराला सिरीयलमधून काढल्याचा आरोप
X

मुंबई : देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप अनेक कलाकार वारंवार करत आहेत. पण आता महाराष्ट्रात सांस्कृतिक दहशतवाद निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला कारण ठरले आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. पण किरण माने यांनी राजकीय भुमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप होतो आहे, तसेच स्टार वाहिनीविरोधात अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच किरण माने यांच्या समर्थनार्थ ट्विटवर #istandwith_KiranMane हा हॅशटॅगही ट्रेंड होतो आहे.

किरण माने यांनी सोशल मीडियावर भाजपविरोधात एक राजकीय पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांना या मालिकेमधून काढण्यात आले असा आऱोप त्यांचे समर्थक करत आहे. पण स्टार प्रवाहच्या या निर्णयाला सांस्कृतिक दहशतवाद म्हणत #istandwith_kiranmane हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे. दरम्यान स्टार प्रवाहन वाहिनीने या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन सध्या दिलेले नाही.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत किरण माने यांनी विलास पाटील नावाची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयामुळे किरण माने लोकप्रिय झाले आहेत. किरण माने हे काही मोजक्या कलाकारांपेकी आहेत जे सध्या घडणाऱ्या घटनांबद्दल आपले मत परखडपणे व्यक्त करत असतात. आपल्या परखड मतांमुळे ते चर्चेत देखील असतात.

गुरुवारी किरण माने यांनी "काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!," अशा आशयाची फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यानंतर त्यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली आणि आपण राजकी भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती चॅनलने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

किरण मानेंविरोधात स्टार प्रवाह वाहिनीने केलेल्या कारवाईवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. तर किरण मानेंच्या चाहत्यांनी किरण माने यांना पाठींबा दर्शवत #istandwith_kiranmane हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. तर किरण माने यांच्या चाहत्यांनी या कारवाईला सांस्कृतिक दहशतवाद असे म्हटले आहे.

किरण मानेंच्या समर्थनार्थ ट्वीट करत प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे की, स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील उमदा कलाकार किरण माने यांना भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून काढून टाकला गेलाय. कारण काय तर भाजप विरोधात लिखाण करतात. असे म्हणत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. वेळीच सुधरा असे म्हटले आहे.

किरण मानेंच्या प्रकरणावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, "किरण माने या गुणी कलाकाराने सद्यपरिस्थितीबद्दल मत व्यक्त केले तर ते भाजपला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले. हा भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजप विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी", अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, स्टार प्रवाहावरील "मुलगी झाली हो" या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली. तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही. स्टार प्रवाह नि एका नवीन वादाला तोंड फोडले आहे त्यांनी ह्यात पडायची गरज नव्हती, अशा शब्दात किरण मानेंना पाठींबा दर्शवला आहे.

किरण मानेना मालिकेतून काढल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. तर अनेकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर बहिष्कार करण्याची मागणी केली आहे. याबरोबरच किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यास भाजपाविरोधात केलेली टीका कारणीभूत असल्याचा आरोप सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.

Updated : 2022-01-14T15:01:08+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top