Home > News Update > अमृता फडणवीसांचा नवीन व्हिडिओ, चाहत्यांना केले चॅलेंज.. । Amruta Fadnavis

अमृता फडणवीसांचा नवीन व्हिडिओ, चाहत्यांना केले चॅलेंज.. । Amruta Fadnavis

अमृता फडणवीसांचा नवीन व्हिडिओ, चाहत्यांना केले चॅलेंज.. । Amruta Fadnavis
X

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नुकतेच नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. आपल्याला माहित आहे अमृता फडणवीस यांनी अत्यंत कमी कालावधीत संगीत शेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग त्यांना अनेक वेळा समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आलं. पण या ट्रोल गँगकडे त्यांनी कधीही लक्ष दिल नाही. त्यांचं नुकताच प्रदर्शित झालेलं 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. या गाण्याला पहिल्या २४ तासात ११ मिलियन लोकांनी पाहिलं आहे, तर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला दाखवा!

अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याच्या प्रमोशन साठी आता त्यांनी समाजमाध्यमांवर सर्वाना एक आवाहन केले आहे. तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला दाखवा! असं अमृता फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज दिले आहे.

6 जानेवारी रोजी अमृता फडणवीस यांचे हे नविन गाण प्रदर्शित झाले. गाण प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला आत्तापर्यंत २१ मिलियन इतक्या लोकांनी पाहिलं आहे. या नव्या गाण्यात अमृता यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. याच गाण्यातील एका डान्स स्टेपचा व्हिडिओ त्यांनी सोशल सोशलमिडियावर शेअर केली आहे. अमृता यांनी आपल्या चाहत्यांना या गाण्यावर डान्स करण्याचे चॅलेंज दिले आहे.

Updated : 9 Jan 2023 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top