Home > News Update > मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य भाजपसाठी नसून इतर माजी सहकाऱ्यांसाठी असेल- अमोल मिटकरी

मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य भाजपसाठी नसून इतर माजी सहकाऱ्यांसाठी असेल- अमोल मिटकरी

मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य भाजपसाठी नसून इतर माजी सहकाऱ्यांसाठी असेल- अमोल मिटकरी
X

सत्ता न मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत सर्वच भाजप नेते सत्ताबदलाची भविष्यवाणी करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मधील केलेले भावी सहकाऱ्यांचे वक्तव्य हे भाजपसाठी नसून इतर जुन्या सहकाऱ्यांबद्दल असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार मिटकरी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यातून नैराश्याने भाजपचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत, असे मिटकरी यावेळी म्हणाले, तसेच आमच्या पक्षात आमदार लंकेंसारखे कामाचा झंजावात उभा करणारे आमदार असल्याने त्यांना ते रुचत नसावे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

Updated : 17 Sep 2021 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top