Home > News Update > अमित ठाकरेंचा ताफा अडवला, समृद्धी टोलनाक्यावर MNS चे खळ्ळ् खट्याक

अमित ठाकरेंचा ताफा अडवला, समृद्धी टोलनाक्यावर MNS चे खळ्ळ् खट्याक

अमित ठाकरेंचा ताफा अडवला, समृद्धी टोलनाक्यावर MNS चे खळ्ळ् खट्याक
X

नाशिक – महाराष्ट्रातील बहुचर्चित हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसैनिकांनी फोडल्याची माहिती समोर येत आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून त्याचा टोलनाका फोडण्याची ही पहिलीच घटना आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जात असतांना सिन्नरजवळील टोलनाक्यावर त्यांना अर्धा तास इथल्या कर्मचाऱ्यांनी अडवल्यामुळं संतप्त झालेल्या मनसैनिकांनी सिन्नरचा टोलनाकाच फोडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

२२ जुलै रोजी अमित ठाकरे यांचा ताफा अहमदनगर हून सिन्नरला जात होता. या दरम्यान अमित ठाकरे यांच्या ताफ्याला टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धातास रोखून ठेवलं होतं. त्यामुळं संतप्त झालेल्या मनसैनिकांनी हा टोलनाकाच उध्वस्त केला.


Updated : 23 July 2023 6:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top