Home > News Update > Amit Thackeray; नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर - बाळा नांदगावकर

Amit Thackeray; नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर - बाळा नांदगावकर

Amit Thackeray; नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर - बाळा नांदगावकर
X

नाशिक – महाराष्ट्रातील बहुचर्चित हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसैनिकांनी फोडल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जात असतांना सिन्नरजवळील टोलनाक्यावर त्यांना अर्धा तास इथल्या कर्मचाऱ्यांनी अडवल्यामुळं संतप्त झालेल्या मनसैनिकांनी सिन्नरचा टोलनाकाच फोडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान बाळा नांदगावकर म्हणाले की "अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्ट टॅग आहे. त्यामुळे टोलनाक्यावर प्रॉब्लेम येत नाही, तिथे टोलनाक्यावर गेल्यावर तिथला टोलनाक्याचा खांब इलेक्ट्रीक प्रॉब्लेममुळे वरती झाला नाही. त्यामुळे कार्यकर्ते सोबत होते त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं. तिथले कर्मचारी उद्धटपणे बोलले. त्यामुळे नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला असल्याचं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं




Updated : 23 July 2023 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top