Home > Election 2020 > अमित शाहांची नात आणि बालिश राजकारण

अमित शाहांची नात आणि बालिश राजकारण

अमित शाहांची नात आणि बालिश राजकारण
X

मला आज भयंकर वाईट वाटत होते आमचे पुरोगामी मित्र अमित शहांच्या नातीने टोपी नाकारली म्हणून खूश होत पोस्ट करत होते. ते तेव्हढं स लेकरू त्याला काय समजत? तिला ती टोपी फॅमिलियर नव्हती. म्हणून नाही घातली पण आपण ही अशा चर्चेत सहभागी होतो आणि अमित शाहांच्या नातीला नकळत महत्व देवून त्यांच्या घराणे शाहिला खतपाणी घालत असतो.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची 6 किंवा 7 वर्षाची लेक तिला मीडियातील काही मित्र विचारत होते. तू शाळेत इंदिरा गांधीं वर भाषण का नाही दिलं? आणि ते लेकरू सांगत होते "त्या आमच्या शत्रू आहेत" जाम राग येत होता त्या प्रतिनिधींचा...

आपल्या राजकारणात खरंच असे मुद्दे आणि लहान लेकरांना आणांव का? आपणच नकळत त्यांना खूप महत्व देतो. विशेष वागणूक देतो. मग ते तसेच असामान्य असल्यासारखे वाढतात. आणि नंतर आपणच त्यांच्यावर घराणे शाहीची टीका करतो. या मानसिकतेतून आपण केव्हा बाहेर पडू?

निवडणूकीच्या काळात आपले मुद्दे रोजगार,नौकरी, नोटबंदी, हमी भाव, कर्ज मुक्ति ,महिला सुरक्षितता, वन अधिकार कायद्या बाबत सुप्रीम कोर्टातील सरकारची भूमिका ,आपली डबघाईला आलेली आर्थिक व्यवस्था, कमी झालेला GDP, राष्ट्रवादाचा चुकीचा अर्थ आणि त्यातून झालेल्या धार्मिक दंगल, मागील वर्षभरात कमी झालेले 1कोटी रोजगार, खाजगीकरण ,विकासाची अवधरणा असे अनेक मूलभूत प्रश्न आपण निवडणुकीचे मुद्दे बनवायला हवेत.

निवडणुकीच्या काळात राज्यकर्ते करत असलेले बेताल वक्तव्य यावर आपण त्यांना धारेवर धरायला हवे. नाकी कोणाच्या नातीने व मुलीने काय केले? या वर चर्चा करायला हवी.

माझा देश माझे मत माझा मुद्दा

Updated : 31 March 2019 9:36 PM IST
Next Story
Share it
Top