Home > News Update > अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी उड्डाण सुरू करणार

अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी उड्डाण सुरू करणार

अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी  उड्डाण सुरू करणार
X

मुंबई : मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअरचे 9 ऑक्टोबरपासून उड्डाण सुरू करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. एअर इंडिया लवकरच एका खासगी कंपनीच्या ताब्यात जाणार आहे. दरम्यान अलायन्स एअरने बुधवारी सांगितले की ते 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाणे सुरू करणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे.

या विमानतळा वरून उड्डाण सुरू झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरू करेल. ग्रीनफिल्ड विमानतळाला व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी विमान सुरक्षा नियामक डीजीसीएकडून गेल्या आठवड्यात एरोड्रोम परवाना मिळाला. दरम्यान अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू करणार आहे. ही सेवा केंद्र सरकार संचालित प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे.

Updated : 23 Sep 2021 2:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top