Home > News Update > खावटी वापटात आदिवासी बांधवांची थट्टा ; निकृष्ट धान्य देऊन बोळवण केल्याचा आरोप

खावटी वापटात आदिवासी बांधवांची थट्टा ; निकृष्ट धान्य देऊन बोळवण केल्याचा आरोप

खावटी वापटात आदिवासी बांधवांची थट्टा ; निकृष्ट धान्य देऊन बोळवण केल्याचा आरोप
X

यवतमाळ : पहिल्या व दुसर्‍या लॉकडाऊन काळात राज्यातील 11 लाख 55 हजार आदिवासी बांधवांना खावटी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. नुकतेच धान्य स्वरूपात खावटीचे वाटप सुरू करण्यात आले. परंतु, हे धान्य निकृष्ट दर्जाची असल्याने राज्य सरकारने आदिवासी समाज बांधवांची थट्टा केल्याचा आरोप केला जात असून, यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये चार हजार रुपये खावटी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यात दोन हजार रोख बँक खात्यात व दोन हजार रुपये किंमतीच्या धान्याचा समावेश होता. पहिली घोषणा हवेत विरल्यानंतर दुसर्‍या

लॉकडाउनमध्ये घोषणांचा पाऊस पडला. दोन हजार रुपये किंमत असलेले धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यात निकृष्ट दर्जाचे तेल, तिखट, चहापत्तीचा समावेश आहे. तेल खाण्यायोग्य नाही. तिखटात खडे आहे. चहापत्तीला घाण वास येतो, हरभरे पोखरलेले असल्याचे लाभार्थी सांगतात.

दोन हजार रुपये खात्यात टाकल्याचा मॅसेज लाभार्थ्यांना आला. त्यामुळे पायपीट करीत बँक गाठली असता, कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झाले नाही, असे सांगण्यात आले. निकृष्ट धान्याचे भोजन केल्याने अनेक जण आजारीही पडले आहेत. धान्य किट दोन हजारांची असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा बाजारभाव 1100 रुपये आहे. उर्वरित पैशावर अधिकारी व राजकारण्यांनी डल्ला मारल्याचा आरोप केला जात आहे. या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी संग्राम पवार यांनी सांगितले की, धान्य किटच्या सॅम्पलची तपासणी केली. त्यानंतर वाटप करण्यात आले. निकृष्ट किट असल्यास बदलून देण्यात येईल आणि वाटप थांबवण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Updated : 3 Sep 2021 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top