Top
Home > News Update > मतदारांना निशाणीसोबत पैसे वाटप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मतदारांना निशाणीसोबत पैसे वाटप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मतदारांना निशाणीसोबत पैसे वाटप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
X

औरंगाबाद: राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली आहे. पण काही ठिकाणी मतदापांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहे तर काही ठिकाणी चक्क पैसेसुद्धा वाटप केले जात आहेत, अशी चर्चा सुरू आहे. असाच पैसे वाटप करण्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत मतदारांना पॉम्प्लेटसोबत पैसे दिले जात असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरखेडच्या घडामोडी ग्रुप या व्हाट्सएप ग्रुपवर हा फोटो टाकण्यात आला होता.

ज्यांचे फोटो ग्रुपमध्ये व्हायरल झाले आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान विरोधकांनी य़ाप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.


gram panchayat

Updated : 12 Jan 2021 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top