Home > News Update > #TajMahal याचिकेवरुन न्यायालयाने खडसावले: म्हणाले उद्या चेंबरमध्ये यांची मागणी कराल?

#TajMahal याचिकेवरुन न्यायालयाने खडसावले: म्हणाले उद्या चेंबरमध्ये यांची मागणी कराल?

#TajMahal याचिकेवरुन न्यायालयाने खडसावले: म्हणाले उद्या चेंबरमध्ये यांची मागणी कराल?
X

आज तुम्ही ताजमहालाच्या खोल्यांची तपासणी करण्याची मागणी करत आहात. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायची मागणी कराल. ताजमहल कोणी बनवला ते आधी शोधा. विद्यापीठात जाऊन अभ्यास करा, पीएचडी करा आणि त्यानंतर न्यायालयात या, " अशा कडक शब्दात अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्या भाजप पदाधिकाऱ्यांला सुनावलं आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहलच्या (Taj Mahal Case) २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच सुनावले आहे.

उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. इतिहासात एम. ए करा. नेट जेआरएफ करून संशोधनासाठी विषय निवडा. मग कोणत्याही संस्थेने संशोधन करण्यापासून रोखले तर आमच्याकडे या. तुमच्यानुसार इतिहास बदलणार नाही. आता इतिहास तुमच्या म्हणण्याप्रमाणे बदलायचा का? असे खडेबोल न्यायालयाने सुनावले आहे.

अनेक खोल्या बंद असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे, असं याचिकाकर्त्याने म्हटलं. तसेच कोर्टात झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते रजनीश सिंह यांचे वकील म्हणाले की, देशातील नागरिकांना ताजमहालचे सत्य जाणून घ्यायचे आहे. ताजमहालमध्ये काही लपवले गेले असेल तर ते जनतेला कळले पाहिजे. औरंगजेबने वडिलांना लिहिलेले पत्र मी पाहिले आहे, असा युक्तीवाद वकिलाने केला.

ताजमहल शहाजहानने बांधला नाही यावर तुमचा विश्वास आहे का? तो कोणी बांधला किंवा ताजमहलचे वय काय याचा निर्णय देण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? तुमचा विश्वास असलेली ऐतिहासिक तथ्ये तुम्ही आम्हाला सांगणार का?. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेपुरते मर्यादित राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मला यावर काही निर्णय दाखवायचे आहेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, ही याचिका माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे आणि आता तुम्ही हे सर्व करत आहात. तुम्ही या विषयावर माझ्या घरी या आणि आम्ही त्यावर वाद घालू पण कोर्टात नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Updated : 12 May 2022 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top