Home > News Update > #Budget2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्वी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन...

#Budget2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्वी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन...

अर्थसंकल्पीय आधिवेशनापूर्वी संसदेच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकाराने सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

#Budget2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्वी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन...
X

उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशना अगोदर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक संसद भवनात पार पडणार आहे. संससदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाततील पक्षांचे नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकार सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्य करण्याची मागणी करणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सूरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण मांडले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांना आपल्या अडचणी या बैठकीत मांडता येणार आहेत. विरोधीपक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे मुद्दे उपस्थित करणार आहेत. ते केंद्र सरकारकडे या बैठकीत मांडणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात पार पडणार आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. ६६ दिवसात जवळपास २७ बैठका होणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीया अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत संबंधित विभागाच्या बैठका पार पडणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार असून तो ६ एप्रिलपर्यंत असणार आहे.

Updated : 30 Jan 2023 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top