Home > News Update > मोठा निर्णय: मुंबईतील रुग्णालयांतील बेड्स आणि अम्ब्युलन्स ची संख्या आता ऑनलाईन...

मोठा निर्णय: मुंबईतील रुग्णालयांतील बेड्स आणि अम्ब्युलन्स ची संख्या आता ऑनलाईन...

मोठा निर्णय: मुंबईतील रुग्णालयांतील बेड्स आणि अम्ब्युलन्स ची संख्या आता ऑनलाईन...
X

सध्या मुंबई मध्ये देशात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातच अनेक लोकांना उपचार मिळत अशी तक्रार समोर येत आहे. त्यानुसार मुंबई पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी पालिका उद्यापासून बेड्स आणि रुग्णवाहिका ऑनलाईन करीत असल्याची घोषणा केली आहे.

यामुळं रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तसेच डॉक्टरांची देखील मोठी सोय होईल अशी माहिती चहल यांनी दिली आहे.

मुंबईत राबवत असलेल्या ‘चेस दि व्हायरस’ मोहीममुळे प्रत्येक एका पॉझिटिव्ह रूग्णामागे आपण दररोज किती संपर्क शोधतो हे काळजीपूर्वक तपासले जात आहे. तसंच किती जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले ते पाहिले जाते आहे. अशी माहिती चहल यांनी आज मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये दिली आहे.

Updated : 27 May 2020 6:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top