Home > News Update > अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, सलाईन स्टॅण्ड डोक्यात घालून फोडला डोळा

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, सलाईन स्टॅण्ड डोक्यात घालून फोडला डोळा

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, सलाईन स्टॅण्ड डोक्यात घालून फोडला डोळा
X

रायगड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. डॉक्टर देखील दिवस रात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वत:च्या जीवाची परवा न करता धडपडत आहेत. मात्र, स्वत:चं जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर रुग्णाने हल्ला केला आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने मध्यरात्री अचानक डॉक्टरवर सलाईन च्या स्टँड ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत डॉक्टरचा डावा डोळा निकामी झाला आहे. याबाबत रुग्णांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये लोणारे येथील एका रुग्णांवर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मध्यरात्री २.३० च्या सुमारास डॉ. स्वप्नदीप थळे काम करीत होते. त्यावेळी अचानक या रुग्णाने डॉक्टरच्या मागून येऊन सलाईनचा स्टॅन्ड डोक्यात मारला. या हल्ल्यात डॉ. स्वप्नदीप थळे गंभीर जखमी झाले असून त्यांचा डावा डोळा निकामी झाला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टरांवरील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.

Updated : 14 July 2021 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top