Home > News Update > शिंदेना बोललं की हे भू.. भू.. करतात; पवारांची विखारी टीका

शिंदेना बोललं की हे भू.. भू.. करतात; पवारांची विखारी टीका

शिंदेना बोललं की हे भू.. भू.. करतात; पवारांची विखारी टीका
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत आणि राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदे गटाच्या आमदावर विखारी टीका केली. कराड-चिपळूण रस्त्याचं किती वर्ष काम चालू आहे, काय करातोय इथला आमदार? असा सवाल उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj Desai) यांच्यावर विखारी टीका केली आहे.

तस सारखचं काही झालं तरी टिव्हीच्या पूढे सगळा मक्ता यांनीच घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) साहेबांवर बोलल तरी हाच भू.. भू.. भू.. करतो कुणावरही काही झाल तरी यानीच बोलायचं. माणसाने सत्ता आली की, सत्तेची नशा चढू द्यायची नसते. अशी टीका अजित पवारांनी शंभूराज देसाईंवर केली आहे.

पाटण बाजार समितीच्या निवडणूकीवर देखी अजित पवार टोला लगावला ते म्हणाले राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता,"शड्डू ठोकून विकासकामं होत नाही, आपली तब्येत काय, आपण करतोय काय"? असं म्हणत शंभुराज देसाई यांची खिल्ली उडवली.

Updated : 29 May 2023 2:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top