Home > News Update > अजित पवारांनी अमित शहांसाठी व्हीव्हीआयपी सूट सोडला ; हसन मुश्रीफांनी अधिकारी सोडले नाहीत

अजित पवारांनी अमित शहांसाठी व्हीव्हीआयपी सूट सोडला ; हसन मुश्रीफांनी अधिकारी सोडले नाहीत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात मुक्कामी आहे. पण, ऐनवेळी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था न झाल्याचं समोर आलं. अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने सर्किट हाऊसमधील आपला VVIP सूट अमित शहांसाठी उपलब्ध करून दिला.

अजित पवारांनी अमित शहांसाठी व्हीव्हीआयपी सूट सोडला ; हसन मुश्रीफांनी अधिकारी सोडले नाहीत
X

अहमदनगर // राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठेपणा आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा पुण्यात मुक्कामी आहे. पण, ऐनवेळी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था न झाल्याचं समोर आलं. अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने सर्किट हाऊसमधील आपला VVIP सूट शहांसाठी उपलब्ध करून दिला.भाजप नेते , राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दाखवून दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. ते काल पुण्यात मुक्कामी होते. पुण्यातील क्विन्स गार्डन येथील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली. पण, कोणताही व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी सूट राखीव असतो. तसंच प्रीमिअम सूट हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असतो. अजित पवार शनिवारी आणि रविवारी पुण्यात मुक्कामी असल्याने त्यांच्या नावावर सूट बूक होता.

प्रशासनाने अमित शहा यांच्यासाठी सूट उपलब्ध नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कानी घातली. अजित पवार यांनी क्षणाचा विलंब न लावता अमित शहा यांच्यासाठी आपला व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करून दिला.

अजित पवारांनी सूट सोडला, हसन मुश्रीफांनी अधिकारी सोडले नाही

एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आपला VVIP सूट सोडला असला तरी काल अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल विभागाचे अधिकारी मात्र सोडले नाहीत. अमित शहा यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या दिवशीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्हा दौरा केला. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अमित शहा यांच्या कार्यक्रमाकडे जाता येणार नाही याची खबरदारी हसन मुश्रीफ यांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही मुश्रीफ यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. त्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, मला सहकार विभागासंदर्भात काही मुद्दे अमित शहा यांच्यासमोर मांडायचे होते पण मला कार्यक्रमाचे निमंत्रण आले नाही. दरम्यान , मी जाणून बुजून आजच दौऱ्यावर आलो नाही तर उद्यापासून आचारसंहिता लागणार असल्याने मला आज यावं लागलं , नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेणं गरजेचं आहे असं मुश्रीफ म्हणाले.

Updated : 19 Dec 2021 2:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top