अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

courtesy - social media

महाराष्ट्रात सातत्याने नाटयमय घडामोडी घडत आहेत. आता या नाट्यात राजकरणात नवा भूकंप झाला आहे. २३ तारखेला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. २३ तारखेला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती.

हे ही वाचा…

कुटुंबाला वाळीत टाकलं म्हणून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न 
मी राजीनामा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संविधान दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांऐवजी घटना दुसऱ्या कोणी लिहिली असती तर…

गेल्या चार दिवसापासून अजित पवार यांची मनधरणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंडळी करत होते. कुठेतरी मनधरणीला यश आलंय. अवघ्या चार दिवसात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आत्ताच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी आहे. अजित पवार हे सक्रिय राजकरणातून संन्यास घेणार या मुददयावर राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबददल पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.