Home > News Update > जो गुंता झाला आहे, त्यातून मार्ग काढा अशी अजित पवार गटाने विनंती केली - जयंत पाटील

जो गुंता झाला आहे, त्यातून मार्ग काढा अशी अजित पवार गटाने विनंती केली - जयंत पाटील

जो गुंता झाला आहे, त्यातून मार्ग काढा अशी अजित पवार गटाने विनंती केली - जयंत पाटील
X

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यात अजित पवार समर्थक नेत्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. त्यामुळं जो गुंता झालाय, त्यातून मार्ग काढण्याची विनंती अजित पवार समर्थक नेत्यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय.

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार समर्थक नेते आणि मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. या संपूर्ण घटनेवर शरद पवार यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षांतर्गत जो गुंता झालेला आहे, त्यातून मार्ग काढण्याची विनंती अजित पवार समर्थकांनी केलीय. आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. आमच्याकडे १९ ते २० आमदार असून काही आमदार तटस्थ असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. पक्षाचे चीफ व्हीप जितेंद्र आव्हाड हेच व्हीप बजावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सगळेच परत आले तर आम्हांला आनंदच होणार असल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

Updated : 16 July 2023 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top