Cabinet Decision: अजितदादांचे 'हे' फर्मान मुख्यमंत्र्यांसाठी तर नाही ना?
X
कोरोनाच्या साथीमुळे अनेक मंत्री कॅबिनेटला दांडी मारत होते. कोणी ऑनलाईन उपस्थित राहत होते. तर कोणी प्रवासात आहे, नेटवर्क नाही अशी कारण देत बैठकीला दांडी मारत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचं फर्मान सोडलं आहे.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री स्वत: कोरोनाच्या साथीनंतर पहिल्यांदाच कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीला अजिबात गैरहजर राहू नका, अशी तंबी अजितदादांनी मंत्र्यांना दिली खरी... मात्र, ही तंबी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना देखील होती का? कारण मुख्यमंत्री देखील बैठकीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष हजर होते. मुख्यमंत्रीच बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिले तर बाकी मंत्र्यांना काय सांगणार? म्हणून अजित पवार यांनी बैठकीला यायचं म्हणजे यायचं असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनाच फर्मान सोडलंय का? असा सवाल उपस्थित होतो.
नक्की काय होते?
मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात होत असताना संबंधित खात्याच्या मंत्र्यांबरोबरच त्यांचे सचिव देखील या ठिकाणी उपस्थित असतात. ऑनलाईन मंत्री उपस्थित असल्यास अनेक वेळा नेटवर्क नसल्याने समन्वय ठेवण्यास अडथळा निर्माण होतो. मंत्री एकीकडे संबंधित खात्याचे सचिव एकिकडे असा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत अडथळा निर्माण होतो. त्यातच स्वत: मुख्यमंत्री उपस्थित असल्यास अनेक निर्णय घेण्यास सुलभता येते.
त्यामुळे समन्वयाचा भाग म्हणून तीनही पक्षाच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकी अगोदर बैठक घेण्यात येणार आहे.






