Home > News Update > अजित दादा - सुनेत्रा पवार कॅरममध्ये रमले, कोणी दिली कुणाला मात ?

अजित दादा - सुनेत्रा पवार कॅरममध्ये रमले, कोणी दिली कुणाला मात ?

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. मात्र यामध्ये कुणी कुणाला मात दिली? जाणून घेण्यासाठी वाचा...

अजित दादा - सुनेत्रा पवार कॅरममध्ये रमले, कोणी दिली कुणाला मात ?
X

अजित पवार यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान देत पराभूत केलं. त्यामुळे अजित पवार यांनी ठरवलं तर कुणालाही पराभूत करू शकतात? अशी चर्चा रंगली आहे. मात्र अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये बारामती ज्येष्ठ नागरिक निवास कै. रघुनाथ गेनबा चॅरिटेबल ट्रस्टच्या 'मेहता भोजन कक्ष' आणि श्रवण करमणूक केंद्राच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे कॅरम खेळात आमने-सामने आले. मात्र यावेळी अजित पवार यांच्याकडून ड्यू झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

अजित पवार यांनी महाराष्ट्रात अनेकांना आव्हान देऊन पराभूत केलं असलं तरी पत्नीसमोर अजित पवार यांना पराभूत व्हावं लागल्याचं चित्र आहे.

Updated : 21 May 2023 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top