News Update
Home > News Update > खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल

खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल

खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल
X

अहमदनगर : अहमदनगर येथील बुरुडगाव रोडवर असलेल्या साईनगर येथे विजेचा शॉक लागून 30 वर्षीय अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला. हि घटना 31 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी टि.व्ही. केबल मालक, महावितरणचे वायरमन, ज्यु. इंजिनिअर, केबल पुरवठादार, टिव्ही केबल पुरवठादार अशा 6 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश गायकवाड हे त्यांची पत्नी विजया, मुलगा अजिंक्य व सुन असे हॉलमध्ये गप्पा मारत टि.व्ही. पाहत बसले असताना खिडकीतून स्पार्किंगचा आवाज येत असल्याने अजिंक्य तिकडे पाहण्यासाठी गेला असता त्याचा हात खिडकीचे ग्रॅनाईटला लागला आणि त्याला इलेक्ट्रीक शॉक बसला, त्या वेळी घरातील सर्वजण हॉलमध्ये काय झाले हे पाहण्यास गेले असता अजिंक्यला इलेट्रीक शॉक बसल्याने तो बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसला. त्याच्या मित्रांनी त्याला आनंदऋषी हॉस्पीटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी अजिंक्य हा मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी येवून घराची पाहणी केली. पाहणीत बाहेरील बाजुने टिव्ही केबल बांधलेली होती. या केबलची पाहणी केली असता टि.व्ही. केबल असलेल्या ठिकाणी ११ के.व्ही. लाईटचे तारांचे वरुन आलेली दिसली.

सदरची टि.व्ही. केबल ही ११ के.व्ही तारांचे वरुन आल्याने टि.व्ही. केबल तारांना घासुन त्यामधून इलेक्ट्रीक सप्लाय पास होवून अजिंक्य यास इलेक्ट्रीक शॉक बसलेला आहे हे आढळून आले.दरम्यान पोलिसांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधुन त्याबाबत तपास केला, लोकल टि.व्ही. नेटवर्कची इनकमर केबलचे घर्षण महावितरण कंपनीच्या वीज वाहंकासोबत झाल्याने लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या इनकमर केबलचे बाहेरील इन्सुलेशन आवरण निकामी होवुन आतील वाहकामध्ये विद्युत प्रवर्तन होवुन, लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या केबलमध्ये लिकेटच करंट आल्याने सदर अपघात घडल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुरेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केबल चालक वनीता अनिल बोरा, पियुष अनिल बोरा ,महावितरण कंपनीचे सदर ठिकाणी खांबावरील विजवाहक उपारीतारावर चढविणारे संबंधित कर्मचारी, महावितरण कंपनीचे या ठिकाणी असणारे ज्यूनियर इंजिनियर, पियुष बोरा यांना केबल कनेक्शन पुरविणारे अहमदनगर, जिल्हयाचे पुरवठादार, टि.व्ही. केबल पुरवठादार कंपनी. या 6 जणांविरुध्द मृत्यूस कारणीभूत असल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Updated : 13 Oct 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top