Home > News Update > Break the chain : सर्व दुकाने आणि मॉल्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Break the chain : सर्व दुकाने आणि मॉल्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Break the chain : सर्व दुकाने आणि मॉल्ससाठी सरकारची मोठी घोषणा
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह इतर सर्व दुकाने आणि मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. तर रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि मॉल्स बंद ठेवण्यात येणार आहेत.

राज्यातील रुग्णवाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत. पण लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती केली आहे. तसेच वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा, उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबल करा व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो आहोत. पण पुढची जी संभाव्य लाट आहे त्याबाबत केंद्रानेही आपल्याला निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्बंध शिथिल झाले तरी प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Updated : 2 Aug 2021 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top