Ahilyanagar| संगमनेरच्या जनतेने योग्य कौल दिला – बाळासाहेब थोरात
X
अहिल्यानगर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथली सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “संगमनेरच्या जनतेने योग्य कौल दिला आहे,” असं ठाम मत थोरात यांनी व्यक्त केलं.
थोरात म्हणाले, “संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही शहराच्या विकासासाठी सातत्याने काम केलं आहे. त्याच कामाची पावती जनतेने दिली आहे. जनतेने दिलेला हा कौल आमच्यावर विश्वास दर्शवतो.”
विरोधकांवर टीका करताना थोरात म्हणाले, “आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांकडे सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही. जनतेने त्यांना योग्य जागा दाखवून दिली आहे.”
डॉ. मैथली तांबे यांच्या विजयानंतर संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, या निकालामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.






