Home > News Update > क्रिकेटचा देव जुगार खेळतो ; सचिनकडे नाही पैका, पावली टाका पावली टाका..

क्रिकेटचा देव जुगार खेळतो ; सचिनकडे नाही पैका, पावली टाका पावली टाका..

देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणा आज मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या घरासमोर देण्यात आल्या. आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ऑलनाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे.

क्रिकेटचा देव जुगार खेळतो ; सचिनकडे नाही पैका, पावली टाका पावली टाका..
X

आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ऑलनाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेने आज सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातच ही आंदोलने झाली. यावेळी पोलिसांनी आधी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, बच्चू कडू यांनी नकार दिल्याने अखेर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं. या परिसरात पोलिसांचा मोठी बंदोबस्त ठेण्यात आला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एका जुगाराच्या जाहिरातीत काम केलं आहे. सचिन यांच्या ऑनलाईन गेमची जाहिरात करण्यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते जुगाराला प्रोत्साहन देणारी जाहिरात कशी करू शकतात? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना कडाडून विरोध केला.

बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना जाहिरात केल्याबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणीही केली होती. पण सचिन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. तसेच बच्चू कडू यांनी या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती. पण राज्य सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केलं. राज्य सरकारच काही करत नसल्याने निराश झालेल्या बच्चू कडू यांनी आज अखेर त्यांच्या समर्थकांसह सचिन यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जोरदार निदर्शने केली.

भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या क्रिकेट विश्वातील विश्व विक्रमाबद्दल प्रहार संघटनेला आदर असला तरी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करुन भारतरत्न मिळालेल्या मानसाने ऑनलाईन जुगाराचे Brand Ambassadors ‘ब्रँड अॅम्बेसिडर बनने हि “मानसिक दिवाळखोरी” असून, सचिन तेंडूलकर यांना पैश्याचा मोह सुटला असून त्यांच्या वर्तनात बदल यावा यासाठी सचिन तेंडूलकर यांनी संत साहित्य वाचावे या साठी त्यांना लवकरच मराठीतील संत साहित्य घरपोच देण्यात येणार आहे. असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई अध्यक्ष अजय तापकीर यांनी म्हटले आहे.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींच्या जनमानसांत असलेल्या प्रतिमेचा सकारात्मक उपयोग करून सेवा किंवा उत्पादनाचं ‘ब्रँडिग’ करणं हे सध्याच्या स्पर्धात्मक युगात जणू अपरिहार्य बनलं आहे; परंतु जुगारासारख्या गोष्टीने आज पर्यंत हजारो लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यामुळे लाखो करोडो कुटुंबातील सदस्य वर वाईट परिणाम झाला आहे असे असताना भारतरत्न सारख्या पुरस्काराने सन्मानित माणसाने ज्याचा आदर्श आज समाजातील नवीन पीढ़ी घेत असते अशा सचिन तेंडूलकर यांनी ऑनलाइन जुगाराचे प्रोत्साहन करणे म्हणजे समाजातील नविन पीढ़ीला बरबाद करण्या सारखे होईल.

बच्चूभाऊ कडू म्हणाले की, "खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा व्याजाने घेऊन जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे त्यांनी तारतम्य पाळणे अपेक्षित आहे, या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेऊन पैसे कमावत आहेत."

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची (३० मे 2023 रोजी ) राज्य सरकारच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. असे असताना फक्त पैसासाठी जुगाराची जाहिरात करनाऱ्या सचिन तेंडूलकर यांचा भारतरत्न पुरस्कार वापस घ्यावा यासाठी राष्ट्रपती यांना पत्र पाठवण्यात येणार आहेत. असे प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात प्रहार जनशक्ती पक्ष प्रवक्ता मनोज टेकाड़े म्हटले आहे..

Updated : 31 Aug 2023 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top