शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकेला ठोकले टाळे

2192

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना शेतकरी वर्ग पेरणीच्या चिंतेत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी राज्यात सर्वत्र येत आहेत. या निषेधार्थ वर्धा जिल्ह्यात भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आक्रमक आंदोलन सुरु केलं आहे.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वर्ध्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला टाळे ठोकले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिककर्जाचे वाटप झाले पाहिजे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनाच्या या कठीण काळात पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे करण्यात आली.

जर बँकानी शेतकऱ्यांची अशीचं पिळवणूक सुरुच ठेवली तर विदर्भात एकाही बँकेचे कामकाज चालू देणार नाहीनाही, असा इशारा भूमिका भूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके यांनी दिला आहे. भूमिपूत्र संघर्ष वाहिनीकडून संपुर्ण विदर्भात हे आंदोलन करण्यात येणार आहे.