Home > News Update > कोरोनाचा पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिराळ्यात नागपंचमी होणार नाही ; अंबामाता मंदिरात पूजेसाठी पाच जणांनाच परवानगी

कोरोनाचा पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिराळ्यात नागपंचमी होणार नाही ; अंबामाता मंदिरात पूजेसाठी पाच जणांनाच परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा देखील सांगलीच्या शिराळ्यात नागपंचमी साजरी होणार नाही, नागपंचमीला गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळण्याचे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिराळ्यात नागपंचमी होणार नाही ; अंबामाता मंदिरात पूजेसाठी पाच जणांनाच परवानगी
X

सांगली // नागपंचमीनिमित्त सांगलीच्या शिराळा येथील अंबामाता मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा देखील शिराळ्यात नागपंचमी होणार नाही. कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियम आणि अटींप्रमाणे नागपंचमी साजरी होणार आहे.

दरवर्षी नागपंचमीला शिराळा येथील अंबामाता मंदिरात भाविकांची मोठी मांदिळाली पाहायला मिळत असते मात्र, सलग दुसऱ्या वर्षी हे मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे, तसेच नागप्रतिमेची मिरवणूक देखील काढता येणार नाही, अशा सूचना महसूल प्रशासनातर्फे दिल्या आहेत. नागपंचमीसाठी निघणाऱ्या पालखीला फक्त दहा जणांना आणि अंबामाता मंदिरात पूजेसाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये शेकडो वर्ष जिवंत नागांची पूजा करण्यात येत होती, मात्र 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत 2002 पासून येथील नागपंचमीवर मर्यादा आणण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने, नागांना ताब्यात ठेवणे, मिरवणूक काढणे, यावर महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. न्यायाल्याच्या आदेशानंतर, या ठिकाणी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी केली जात होती. मात्र गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिराळ्यात नागमंचमी साजरी होत नाही.

दरम्यान नागपंचमीला भाविकांनी गर्दी न करता कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे तंतोतत पालन करण्याचे आवाहन संबंधित प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Updated : 13 Aug 2021 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top