Home > News Update > CNG & PNG : पुन्हा इंधन दरात भडका, महागाईने सामान्य नागरिक हैराण

CNG & PNG : पुन्हा इंधन दरात भडका, महागाईने सामान्य नागरिक हैराण

गेल्या काही दिवसापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे इतर वस्तुंच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यातच आता आणखी वाहनांसाठीचा CNG आणि घरगुती वापरासाठीच्या PNG च्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. (Inflation increase in india)

CNG & PNG : पुन्हा इंधन दरात भडका, महागाईने सामान्य नागरिक हैराण
X

गेल्या काही दिवसांमध्ये देशात महागाईचा भडका (Inflation raise) उडाल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या 20 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol price) दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता CNG आणि PNG च्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

राज्य सरकारने 1 एप्रिल पासून CNG आणि PNG गॅसवरचा कर 10% ने कमी केला होता. त्यामुळे CNG च्या दरात 6 रुपये तर PNG च्या दरात 3.50 रुपये घट झाली होती. मात्र त्यानंतर महानगर गॅस लिमिटेडच्या किंमतींमध्ये वाढ होण्याचे कारण घरगुती वापराच्या नैसर्गिक गॅसच्या दरात केंद्र सरकारने 110 टक्के वाढ केली आहे.

CNG च्या दरात 12 दिवसात 12 रुपये वाढ

राज्य सरकारने व्हॅट रद्द केल्यानंतर CNG च्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर 6 एप्रिल रोजी CNG च्या दरात 7 रुपये वाढ करण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा CNG च्या दरात मंगळवारी रात्रीपासून 4.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 12 दिवसात CNG च्या दरात 12 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे CNG price 72 रुपये किलो झाला आहे.

PNG च्या दरात ही वाढ

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत CNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याबरोबरच PNG च्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने PNG च्या दरात 4.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात PNG च्या दरात 9.50 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे PNG च्या दर 45.50 रुपये प्रति युनिट इतका झाला आहे.

Updated : 13 April 2022 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top