Home > News Update > Parag Agrawal : Twitter deal पुर्ण होताच पराग अग्रवाल यांना मस्क यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

Parag Agrawal : Twitter deal पुर्ण होताच पराग अग्रवाल यांना मस्क यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

ट्वीटर डील (Twitter deal) पुर्ण होताच एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Parag Agrawal : Twitter deal पुर्ण होताच पराग अग्रवाल यांना मस्क यांनी दाखवला बाहेरचा रस्ता
X

Twitter CEO parag agrawal : टेस्लाचे सीईओ एलॉन (Tesla CEO Elon musk) मस्क हे ट्वीटरचे मालक बनले आहेत. त्यापार्श्वभुमीवर एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल (Twitter CEO parag Agrawal) यांना काढून टाकले आहे. तसेच पराग अग्रवाल यांना कंपनीच्या मुख्यालयातूनही काढून टाकण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिले आहे.

13 एप्रिल रोजी एलॉन मस्क (Elon musk announce twiiter deal) यांनी ट्वीटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 54.2 डॉलर प्रति शेअर्स या दराने 44 बिलीयन डॉलरची ऑफर दिली होती. मात्र फेक अकाऊंट आणि स्पॅमचे (Fake account and spam) कारण देत मस्क यांनी ट्वीटर डील स्थगीत केली होती. त्यानंतर ट्वीटरने मस्क यांनी डीलला स्थगिती दिल्यानंतर कोर्टात धाव घेतली. यानंतर ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी पुन्हा ट्वीटर डील करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मस्क यांनी ट्वीटरचा ताबा घेतला. त्यानंतर ट्वीटरमध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यापार्श्वभुमीवर मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल, ट्वीटरचे सीएफओ नेड सेगल (Ned segal) आणि लीगल अपेअर पॉलिसी हेड विजया गाड्डे (Vijaya gadde) यांना डील पुर्ण होताच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबरोबरच आगामी काळात ट्वीटरमधील 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता एका मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.

Updated : 28 Oct 2022 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top