Home > News Update > नाटोच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, "तालिबानने

नाटोच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, "तालिबानने

नाटोच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, तालिबानने
X

अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्यापासून १८००० हून अधिक लोकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आले आहे. देश सोडून पळून जाण्यासाठी हतबल झालेले हजारो लोक अजूनही विमानतळावर गर्दी करत होते," असे ओळख न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. याशिवाय तालिबानने लोकांना प्रवासासाठी अधिकृत कागदपत्रे नसलेल्या लोकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे.

"बहुतेक अफगाणी लोक त्यांची मातृभूमी सोडण्यास असमर्थ आहेत आणि जे धोक्यात आहेत त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही", असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेने शुक्रवारी सांगितले. "अफगाणिस्तानातील बहुसंख्य लोक नियमित मार्गांद्वारे देश सोडू शकत नाहीत." असे संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चआयुक्त (UNHCR) च्या प्रवक्त्या शाबिया मंटू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तालिबानने शुक्रवारच्या प्रार्थनेपूर्वी अफगाणी जनतेला एकतेचे आवाहन केले आहे, त्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर इमामांना विमानतळावरील अराजकता, निदर्शने आणि हिंसाचाराच्या वातावरणात लोकांना अफगाणिस्तान सोडू नये यासाठी राजी करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांनुसार, तालिबानने रविवारी राजधानी शहर ताब्यात घेतल्यापासून काबूल आणि आसपासच्या परिसरात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 20 Aug 2021 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top