Home > News Update > करीना कपूरवर बहिष्काराची मागणी का?

करीना कपूरवर बहिष्काराची मागणी का?

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच आता तिच्याविरुद्ध ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेन्ड सुरू झाला आहे. काय आहे हा वाद, वाचा....

करीना कपूरवर बहिष्काराची मागणी का?
X

courtesy social media

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सच्या टीकेला सामोरं जावे लागते आहे. ट्विटरवर तर #BoycottKareenaKhan असा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. याला कारण आहे ते म्हणजे रामायणावरील एका नवीन पौराणिक सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी करिना कपूरने 12 कोटी रुपये मानधन मागितल्याची चर्चा आहे.

यावरुनच सध्या करीनाला ट्रोल केले जात आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना आता पुन्हा एकदा कामाला सुरूवात करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रामायणावरील एका सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शकांनी तिला संपर्क केल्यानंतर तिने 12 कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. यानंतर अनेक नेटिझन्सनी करिनावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. तसेच काहींनी तर करीनावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे.


एकीकडे ही चर्चा असताना सोशल मीडियावर करीनाविरोधात मिम्स आणि ट्विट्सचा पाऊस सुरू झाला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार करिना कपूर एका सिनेमातील भूमिकेसाठी साधारणपमे 6 ते 8 कोटी रुपये मानधन घेते, पण सीतेच्या भूमिकेसाठी तिने 12 कोटी रुपये मागितल्याने अनेकांचा संताप झाला आहे. काही हिंदुत्ववाद्यांनी तर करिनाला ही भूमिका देऊन हिंदूंच्या भावना दुखावू नयेत अशी मागणी केली आहे.



दरम्यान या सर्व प्रकरणावर करिना कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर 'अमर उजाला' च्या वृत्तानुसार या सिनेमाचे लेखक विजय प्रसाद यांनी या भूमिकेसाठी करिनाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे या चर्चांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे.

Updated : 13 Jun 2021 12:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top