News Update
Home > News Update > चंद्रपुरमधील दारूबंदी उठवल्यानंतर बार्शीतील जामगावमध्ये दारूबंदी, ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

चंद्रपुरमधील दारूबंदी उठवल्यानंतर बार्शीतील जामगावमध्ये दारूबंदी, ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

1 एप्रिल 2015 पासून चंद्रपुरमध्ये करण्यात आलेली दारूबंदी 27 मे 2021 रोजी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर बार्शी तालुक्यातील जामगाव(पा) या गावाने दारुबंदीचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपुरमधील दारूबंदी उठवल्यानंतर बार्शीतील जामगावमध्ये दारूबंदी, ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
X

बार्शी तालुक्यातील जामगाव (पा) या गावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री करण्यात येत होती. त्यामुळे या अवैध दारूविक्री विरोधात ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.

बार्शी तालुक्यातील जामगाव (पा) या गावाने दारुबंदीविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तर यावेळी कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तर यासंदर्भात ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मांडला होता. तर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

दारूच्या आहारी जाऊन गावातील दहा ते पंधरा लोकांचे अकाली निधन झाले आहे. त्यातच या सर्व लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे यापुढे अशा प्रकारची भयानक परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी गावातील सर्व अवैध दारू विक्री केंद्र बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. तर यासदंर्भात अखेर निर्णय घेत ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय मंजूर केला आहे. तर या ठरावाची प्रत वैराग्य पोलिस स्टेशन, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायतीने दारूबंदीबाबत ठराव मंजूर केले आहेत. तर चंद्रपुर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 रोजी दारूबंदी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर 27 मे 2021 रोजी राज्य सरकारने महसुलात घट होण्याच्या कारणासह अवैध दारूविक्री, बनावट दारू, गुन्हेगारीत वाढ यासारखी कारणे देत दारूबंदी उठवली होती. मात्र दारूमुळे अनेक संसार उघडल्यावर पडल्याचा दावा करत सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जामगाव (पा) या गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.


Updated : 2022-05-13T11:47:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top