Home > News Update > अर्णब गोस्वामींना प्रश्न विचारणाऱ्या कुणाल कामरांना विमानबंदी

अर्णब गोस्वामींना प्रश्न विचारणाऱ्या कुणाल कामरांना विमानबंदी

अर्णब गोस्वामींना प्रश्न विचारणाऱ्या कुणाल कामरांना विमानबंदी
X

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमान प्रवासात प्रश्न विचारणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा यांना इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईसजेट यांनी ६ महिने विमानप्रवास बंदी केलीये. कुणाल कामरा यांनी विमानात अर्णब गोस्वामींना थेट सवाल करत त्यांच्या पत्रकारितेवर टीका केली होती. "गोस्वामी भित्रे आहेत” अशी टीका कामरा यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली आहे. पण ही बंदी घालण्यात आल्यानंतर कामरा पंतप्रधान मोदींवर टीका केलीये. ‘’सहा महिन्यांच्या निलंबनासाठी मी आभारी आहे. मोदीजी एअर इंडिया कदाचित कायमच निलंबित करून टाकतील."

तर दुसरीकडे "कामरा यांची वागणूक चुकीचीच होती. अशा वागणुकीपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी एअर इंडियामध्येही कुणाल कामरा यांना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास करता येणार नाही," असं म्हणत एअर इंडियाने कामरा यांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

या बंदीवर कामरा यांनी आपल्या खास कॉमेडी अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.

Updated : 29 Jan 2020 8:48 AM GMT
Next Story
Share it
Top