Home > Max Political > हॅशटॅग #ResignModi फेसबूक ने केला ब्लॉक, लोकांच्या टीकेनंतर केला रिस्टोर

हॅशटॅग #ResignModi फेसबूक ने केला ब्लॉक, लोकांच्या टीकेनंतर केला रिस्टोर

हॅशटॅग #ResignModi फेसबूक ने केला ब्लॉक, लोकांच्या टीकेनंतर केला रिस्टोर
X

देशात कोरोनाच्या संकटात अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. लोकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने लोक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर #ResignModi हा हॅशटॅग टाकत आपला राग व्यक्त करत आहेत.

मात्र, हा ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंडींगला येताच, 28 एप्रिलला फेसबुक ने हा हॅशटॅगच काही काळासाठी ब्लॉक केला होता. फेसबूक ने केलेला पराक्रम लोकांच्या लक्षात येताच लोकांनी फेसबूकला सवाल केले. त्यानंतर फेसबूकने हा हॅशटॅग रिस्टोर केला आहे.

अनेक ट्वीटर युजर ने या संदर्भात ट्वीट करत टीका केली आहे.

फेसबूक ने हा शब्द ब्लॉक केल्यानंतर हॅशटॅग #ResignModi लोकांनी सर्च केला असता...या पोस्ट हाइड करण्यात आल्याचं सांगत यातील काही पोस्ट आमच्या कम्युनिटी स्टॅडर्ड्स च्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे..

फेसबूकचं म्हणणं काय आहे?

आमच्या कडून चुकून हॅशटॅग ब्लॉक झाला होता. आम्हाला भारत सरकारने असं करण्यासाठी सांगितलं नव्हतं. सदर हॅशटॅग पुन्हा एकदा रिस्टोर करण्यात आला आहे.

फेसबुक च्या कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट च्या एंडी स्टोन यांनी ट्विटर वर नक्की काय झालं होतं पाहिलं जात आहे. असं सांगितलं आहे.

लोकशाहीत असं होतं का?

फेसबुक ने हा कारनामा केल्यानंतर काही लोकांनी ट्वीटरवर लोकशाहीत असं होतं का?

या अगोदर मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर ने 52 ट्वीट्स सेंसर करत डीलिट केले होते. या ट्वीटमधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती.


Updated : 2021-04-29T15:36:08+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top