Home > News Update > अजित पवार यांच्या बंडानंतर सुरेश लोटलीकर यांची व्यंगचित्रे व्हायरल

अजित पवार यांच्या बंडानंतर सुरेश लोटलीकर यांची व्यंगचित्रे व्हायरल

अजित पवार यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि व्यंगचित्रांचा पाऊस पडत आहे. त्यातच सोशल मीडियावर सुरेश लोटलीकर यांची काही व्यंगचित्रं व्हायरल होत आहेत.

अजित पवार यांच्या बंडानंतर सुरेश लोटलीकर यांची व्यंगचित्रे व्हायरल
X

अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धरळा उडला आहे. त्यातच सुरेश लोटलीकर यांचे व्यंगचित्र व्हायरल होत आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ड्रेस परिधान केलेला एक व्यक्ती दाखवला आहे. त्याच्यासमोर कमळ दाखवण्यात आले आहे. यावर लिहीले आहे की, हे राष्ट्रवादीचे कंकण बांधले हाती, असं म्हणत सुरेश लोटलीकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.




सुरेश लोटलीकर यांचे दुसरे व्यंगचित्र व्हायरल होत आहे त्यामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे व्यंगचित्र काढले आहे. त्यावर लिहीले आहे की, भाजपशी हातमिळवणी केवळ अशक्य, असं म्हटलं आहे. तसेच त्यावर भुज-बळी असं लिहीले होते.





Updated : 3 July 2023 6:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top