Home > News Update > सुरेंद्र गडलिंग यांनी गायली सागर गोरखे यांची तुरुंगात लिहिलेली कविता

सुरेंद्र गडलिंग यांनी गायली सागर गोरखे यांची तुरुंगात लिहिलेली कविता

सुरेंद्र गडलिंग यांनी गायली सागर गोरखे यांची तुरुंगात लिहिलेली कविता
X

कोरेगाव भीमा केसमध्ये अटकेत असलेल्या Adv. सुरेंद्र गडलिंग यांना ऑगस्ट 2021 मध्ये, त्यांच्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीच्या विधीसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता..

या काळात त्यांनी सांस्कृतिक कार्यकर्ते आणि तळोजा कारागृहातील त्यांचे सह-कैदी सागर गोरखे यांची एक गझल गायली. या गझलमध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून या गझलमध्ये सत्ताधाऱ्याचा उल्लेख 'नागडा राजा' असा केला आहे.

गडलिंग म्हणतात

"भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेल्या त्याच्या सर्व सहकारी कैद्यांच्या वतीने मी ही गझल वाचत आहे. "आमचा सर्वांचा दोष एवढाच आहे की आम्ही राजाला नागडा म्हटलं आहे," "हा आमच्या सर्वांकडून राजाला संदेश आहे."

गझलचे वाचन करताना गडलिंग पुढे म्हणतात...

''या गझलेचे लेखक सागर गोरखे यांना पोलिसांनी अटक करण्यापूर्वी माफी मागण्यास सांगितले होते. "पण त्यांनी नकार दिला,"

गझलेतील ही ओळ सध्याच्या एका वादावर चपखल पणे लागू पडते. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वि. दा. सावरकर यांना महात्मा गांधी यांनी इंग्रजांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. असा दावा केला होता. त्या दृष्टीकोनातून ही ओळ खूप काही सांगून जाते. राजनाथ सिंह यांचा हा दावा अनेक इतिहास तज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे. एकंदरींत सत्ताधाऱ्यांपुढे सावरकऱ्यांनी माफी मागितली मात्र, सागर गोरखे यांनी माफी मागितली नाही. असं या ओळीतून स्पष्ट होते.

गडलिंग आणि गोरखे या दोघांवर दहशतवादविरोधी कठोर कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर शहरी नक्षलवाद्यांचा आरोप करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपासह त्यांच्यावर पुण्याजवळ दंगल भडकवल्याचा आरोप आहे.

दरवर्षी 1 जानेवारीला हजारो दलित-बहुजन लोक पुण्यापासून 40 किमी अंतरावर असलेल्या भीमा कोरेगावच्या युद्ध स्मारकाला भेट देतात. हे स्मारक पेशव्यांविरुद्ध दलित सैनिकांच्या मदतीने इंग्रजांनी मिळवलेल्या विजयाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. या ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून हा समाज या ठिकाणी जमत 1 जानेवारीला एकत्र येत असतो. ही लढाई पेशव्यांच्या अस्पृश्यतेच्या विरोधातील लढाईचं प्रतिक मानली जाते.

1 जानेवारी 2018 मध्ये, या लढाईच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त, भीमा कोरेगाव युद्ध स्मारकावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. यावेळी उच्च जातीच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या जमावाने या ठिकाणी कथितपणे हल्ला केल्याचा आरोप आहे.

दंगलीच्या काही दिवसानंतर, पुण्यातील जात विरोधी कार्यकर्त्या अनिता सावळे यांनी हिंदू नेते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे या हल्ल्याचे "मास्टरमाईंड" आहेत. म्हणून तक्रार नोंदवली. तथापि, पुणे पोलीस आणि एनआयएच्या शहरी शाखेने आत्तापर्यंत 16 मानवी हक्क वकील, विद्वान आणि कार्यकर्ते यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर केलेले हे आरोप प्लान्टेड असल्याचं या 16 कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

तू खुशाल गावे वेद पुराणा

तू खुशाल गावी इंद्र स्तुती

मी तर छाती ठोकून म्हणतो

'राजा नागडा' हा कपटी

तुझ्या गजांचे पाणी होईल

जब मी गाईल गीत पुन्हा

खचशील वेड्या, पाहून माझी

लढण्याची उम्मीद पुन्हा

धर्माचे जातीचे सरपण

छाताडावर रचले नऊ मण

चितेवर जळणे, नाकारून जब

मी गुरगुरलो, हाच गुन्हा

तू मागितले माफीनामे,

ठोकरले मी कैक इनामे

इमान माझे खणखणणारे

जगतो खणकावीत

पुन्हा तुझ्या दावणीचे ते 'नटवर'

श्वान होउनी करतील गुरगुर

बंडाची तब, देतो हाळी

गातो मी 'रणगीत' पुन्हा

लाठ्याकाठ्यांचे अंगी वळ

उमटतील जरी, सोशील मी कळ

पर जखमातून फुटतील वेली

शिकतील फुलण्याची, रित पुन्हा

उदार होतील कैक जिवावर,

वाचशील तू कैसा सावर

जळशील वेड्या, पाचोळ्यागत,

समराच्या अग्नीत पुन्हा

सत्तेच्या ह्या उन्मादाचा

माज मुजोरीचा दमनाचा

उतरवतील ती, आवाम सारी

भिम ललकारी देत पुन्हा

- सागर गोरखे

Updated : 22 Oct 2021 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top