Home > News Update > अ‍ॅड. असीम सरोदेंनी घेतली थेट कचरा डेपोत पत्रकार परिषद

अ‍ॅड. असीम सरोदेंनी घेतली थेट कचरा डेपोत पत्रकार परिषद

अ‍ॅड. असीम सरोदेंनी घेतली थेट कचरा डेपोत पत्रकार परिषद
X

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपो संदर्भात कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गवर मागील अनेक वर्षांपासून कचरा डेपोत कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.

मात्र,या सगळ्यांमुळे नागरी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी असीम सरोदे यांनी केला. थेट कचरा डेपोतच सरोदे यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कचरा अव्यवस्थापन आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे मानवी आरोग्य,वातावरणातील प्रदूषण, पर्यावरणाची समस्या हे मुद्दे सरकारी अनास्थेमुळे गुंतागुंतीचे बनतात.

कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवले आहेत त्यांना किमान वेतनही मिळत नाही. बेरोजगारी असल्यामुळे काम जाईल या दबावामुळे स्वच्छता कर्मचारी काम करत राहतात. तसेच सोलापूर- तुळजापुर रस्त्यालगतच्या हद्दवाढ भागात ५५ एकर जमीन शहर घनकचरा साठवण्यासाठी राखीव ठेवली आहे आणि गेल्या ७० वर्षांहूनही अधिक वर्षांपासून येथे कचरा साठवला जातो. या ठिकाणची ९ एकर जमीन बायोएनर्जी प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. परंतू हा प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. असे मत यावेळी अ‍ॅड.असीम सरोदे यांनी व्यक्त केले. दरम्यान जर हा प्रश्न सुटला नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती देखील यावेळी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.

Updated : 26 Oct 2021 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top