Home > News Update > आता तुम्ही देखील वन्य प्राणी घेऊ शकता दत्तक!

आता तुम्ही देखील वन्य प्राणी घेऊ शकता दत्तक!

वन्य प्राण्यांबद्दल प्रत्येकालाच एक वेगळ आकर्षण असते. आता तुम्ही देखील वन्य प्राणी दत्तक घेऊ शकता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे.

आता तुम्ही देखील वन्य प्राणी घेऊ शकता दत्तक!
X

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येणार आहे. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल येथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी आता सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना 1 वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी होण्याचे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी असणार आहे अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमानुसार वाघ दत्तक घेण्यासाठी ३१०००० , सिंह ३०००००, बिबट १२००००, वाघाटी ५००००, नीलगाय ३००००, चितळ २००००, तर भेकर दत्तक घेण्यासाठी १०००० मोजावे लागणार आहेत. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई तसेच अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 28 July 2021 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top