Home > News Update > जव्हार येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजूरी

जव्हार येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजूरी

जव्हार येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजूरी
X

पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यात रिव्हरा रुग्णालयात पूर्णपणे भरले असून तिकडे २०० हुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था असलेले कोव्हिड रुग्णालयाची जव्हार तालुक्यात गरज असून जव्हार येथे असलेले कोविड केअर सेंटर फक्त गोळ्या औषधं देण्याकरिता मर्यादित कोविड सेन्टर आहे.

रुग्णांचा वाढता आकडा बघता पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुलसळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जव्हार येथील युनिव्हर्सल शाळेत २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालय असलेले पतंगशाह कुटीर रुग्णालयात ५० बेडचे ऑक्सिजनची व्यवस्था असलेले रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कुटीर रुग्णालयात ऑक्सिजन खाटा असलेले कोविड रुग्णालय सुरू झाल्यास कर्मचारी वर्ग कमी पडणार नाही. कारण जव्हार कुटीर रुग्णालयात १४ डॉक्टर्स व ३५ नर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचे रुग्णालय स्थापन करण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जव्हार येथील कुटीर रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हा विकास योजनेतून ३ कोटी २० लाखांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून लवकरच जव्हार येथे ऑक्सिजनची समस्या मिटणार आहे.

Updated : 25 April 2021 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top